शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा...: बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान  

<p>शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा...: बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान  </p>

बुलढाणा - शेतकऱ्यांना काहीच येत नसल्यासारखे वाटते, पण आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, असे खळबळजनक विधान  बच्चू कडू यांनी केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बच्चू कडू यांनी, तुम्ही विचारांची लढाई सोडून जाती-पातीच्या भांडणात अडकला आहात, ज्यामुळे शेतकरी मागे पडला आहे. मोर्चे, मेळावे आणि प्रचार सभांना गर्दी असते, पण शेतकरी परिषदांना कमी लोकप्रतिनिधित्व मिळते, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीनं सुरू केलेली लढाई लेखणीने संपवली, तर शरद जोशींनी अर्धा लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी झटले, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीची आठवण करून दिली.