एकनाथ शिंदे हे भिजलेला फटाका : खा.संजय राऊत यांची टीका

मुंबई - "कोण एकनाथ शिंदे ? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सत्तेच्या जीवावरच ते बोलत आहेत. भिजलेला फटाका आहेत. ज्या दिवशी मुंबई आणि ठाणे महापालिकेचा निकाल येईल त्या दिवशी ते ठाणे, मुंबई सोडून निघून जातील, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.
तुम्ही खर्या शिवसेनेचे गुंड आहात तर गुंडासारखं समोर येऊन बोला. सत्तेच्या मागे लपून पोलीसांच्या मागं लपून बोलू नका. सत्तेतून बाहेर याला त्या दिवशी कोण कोणाला सोडत ते सांगतो," असेही त्यांनी म्हटले आहे.