प्रविणसिंह पाटील मंगळवारी भाजपवासी होणार...
मुश्रीफांकडून वारंवार डावलण्यात आलं : प्रवीणसिंह पाटील

कोल्हापूर - प्रविणसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुरगूड येथील निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. या निर्णया बद्दल बोलताना नामदार हसन मुश्रीफांकडून डावललं जात असल्याचं सांगितलं.
नामदार मुश्रीफांसाठी सख्ख्या भावा बरोबरही वैर पत्करलं मात्र कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत असल्यानं भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रविणसिंह पाटील यांनी सांगितले.मुश्रीफ यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केलं, पण कार्यकर्त्यांविरोधात हालचाली सुरू राहिल्या. माझ्या गटावर अविश्वास दाखवला गेला म्हणूनच आता विकास आणि सन्मानासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.आपले बंधू रणजितसिंह पाटील मुश्रीफ गटात गेले आहेत पण त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा असल्याचे प्रवीणसिंह पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुधीर सावर्डेकर, सुरेश लंबे, अमर कांबळे, संभाजी गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवीणसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुरगूडच्या राजकारणात प्रवीणसिंह पाटील हे प्रभावशाली नाव मानले जाते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होणार आहेत. यावर नामदार मुश्रीफ गटाकडून काय रणनिती आखली जाणार हे पहावे लागणार आहे.