पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार : मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा

 

पुणे पदवीधर मतदारसंघावरून महायुतीत जुंपणार ?

 

<p>पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार : मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा</p>

<p> </p>

कोल्हापूर - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल, असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमा दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना पुणे पदवीधर मतदारसंघावर दावा केला आहे.

या निवडणुकीत आमचाच अश्वमेघ जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी या जागेवर भैया माने हे उमेदवार असतील असे म्हटले आहे.

आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे सगळेच थक्क झालेत तर शनिवारी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुदरगड तालुक्यातील कुर या ठिकाणी विजय संकल्प मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी या मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितलाय. एकंदरीतच आता येणाऱ्या काळात या जागेवरून महायुतीमध्ये जुंपणार हे नक्की झाले आहे.