"इतक्यात वर पाठवता का?" - शरद पवार यांनी घेतली कोल्हापुरातील पदाधिकाऱ्याची फिरकी

कोल्हापूर - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी सायंकाळी ते कोल्हापुरात दाखल झाले. शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी कोल्हापूरचे शहराध्यक्ष आर. के. पोवार तिथं होते. यावेळी शहराध्यक्ष पोवार यांनी, "साहेब आता कोणाला भेटणार नाहीत, ते वरती विश्रांतीला जाणार आहेत." असे कार्यकर्त्यांना सांगितलं. यावर शरद पवार साहेबांनी लगेच प्रतीसाद देत “वर म्हणजे हॉटेलमध्येच ना? इतक्यात वर पाठवता का?” असे म्हणत शहराध्यक्ष पोवार यांची फिरकी घेतली. यावेळी उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली आणि शहराध्यक्ष पोवार यांनीही हात जोडत, ‘तसं नाही ओ’ असे म्हणत आपली चूक प्रांज्वळपणे कबूल केली.