प्रकाश महाजन यांचा मनसेला रामराम..!

<p>प्रकाश महाजन यांचा मनसेला रामराम..!</p>

मुंबई – मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मनसेच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे.  गेल्या काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना त्यांनी  मोठा धक्का दिला आहे.
 काही दिवसांआधी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपली खदखद बोलून दाखवत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. गंगेला बोल लावला तेव्हा खरं तर मी तेव्हाच थांबायला हवं होतं, मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा होती पण वाटेला उपेक्षा आली, असं म्हणत महाजन यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.