भारत – पाकिस्तान सामना म्हणजे देशभक्तीचा व्यापार : उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई – उद्या भारत – पाकिस्तान सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “उद्या होणारा सामना हा देशभक्तीचा व्यापार आहे. या सामन्यावर बहिष्कार टाकायला हवा”, असा घणाघात त्यांनी मोदी सरकारवर केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे कि, या सामन्याच्या निषेधार्थ उद्या ठाकरे गटाकडून ‘माझं कुंकू, माझा देश’ अभियान राबवलं जाणार आहे. हा सामना होवू देणे म्हणजे देशभक्तीची थट्टा नाही तर देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. पाकिस्तान आपल्या देशावर दहशतवादी हल्ला करतोय. ज्या पाकिस्तान विरोधात आपण युद्ध पुकारलं त्यांच्याबरोबरच आपण सामना खेळणार आहोत. एखाद्या खेळावर बहिष्कार टाकला म्हणजे सगळं काही संपत नाही. पंतप्रधानांनी सांगायला हवं की, ‘क्रिकेट होणार नाही’ ‘पाकिस्तान जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत क्रिकेट नाही’ अशी बाळासाहेबांची भूमिका होती. हे लक्षात ठेवायला हवे.