"म्हशीला जरी रेडकू झालं तरी येतो, पण खासदार येत नाही म्हणू नका..."

हातकणंगले: हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात उपस्थितांना विनोदी आणि ग्रामीण शैलीत दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, "समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करण्याचा, अगदी टीका सहन करत असतानाही सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. वाईटपणा घेतला तरीही समाजाचं काम करतो. तुम्ही बोलवाल तिथं येतो. म्हशीला जरी रेडकू झालं तरी येतो, पण खासदार येत नाही म्हणू नका..." म्हशीला रेडकू होणं हा ग्रामीण जीवनातील एक अगदी सामान्य आणि छोटा प्रसंग असला, तरी त्याचा उल्लेख करत खासदार माने यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाशी आपण जोडलेले आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.