लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल...

बीड - बीडमधील गेवराई येथे दोन गटात राडा झाला होता. या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील समर्थकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून गेवराई पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक नोटीस देऊन देखील लक्ष्मण हाके गेवराईत उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांनी हाके यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.