मुख्य निवडणूक आयुक्तांची अडचण वाढणार...
विरोधी पक्षाकडून महाभियोग चालवण्याचा निर्णय

नवी दिल्ली – देशात मतचोरीचा प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेवून, खा. राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत माफी मागावी असं म्हटले आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी, "भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवण्याचा निर्णय संसदेतील विरोधी पक्षाने घेतला असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांची अडचण वाढणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, भारताचे निवडणूक आयुक्त निष्पक्ष पद्धतीने काम करत नाहीत. त्यांनी सरळ भारतीय जनता पक्षाची वकिली सुरू केली आहे. ती इतकी की, महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरी आणि घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींवरच आयोगाने खोटारडेपणाचे आरोप केले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षाला आव्हान देण्याची भाषा सुरू केली. त्याहीपुढे जाऊन राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी राजकीय भाषा केलीय. हा एक प्रकारे नियमभंग आहे.