मीरा बोरवणकर यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्या नेत्यांची नावं जाहीर करावीत - सनातन संस्थेचं आवाहन

कोल्हापूर - मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागलेत. या प्रकरणांमध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप सेवा निवृत्त पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलाय. मीरा बोरवणकर यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावं जाहीर करावीत, असं आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार बैठकीत केलय.
मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. यामध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी आरोप सेवा निवृत्त पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी पुणे इथं एका कार्यक्रमात केलाय. मीरा बोरवणकर यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, असं आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. या घटना ज्या काळात घडल्या, त्या वेळी महाराष्ट्रात कुणाचं सरकार होतं ?दाभोलकर हत्येच्या घटनेनंतर तपास चालू होण्यापूर्वीच ‘ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तींनी केलीय’, असं म्हणत तत्कालीन सत्ताधारी नेत्यांनी तपासाला दिशा दिली, हा राजकीय हस्तक्षेप होता, असं मीरा बोरवणकर यांना म्हणायचं आहे का? असा सवाल राजहंस यांनी उपस्थित केलाय.
पुण्यात डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमात मीरा बोरवणकर यांनी खाकीनं हिरवं, भगवं किंवा पांढरं होणं हे अत्यंत घातक असल्याचं विधान केलंय. खाकीनं डावे आणि उजवेही असता कामा नये असं राजहंस यांनी म्हटलंय. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर या ज्या पद्धतीनं अंनिसच्या व्यासपीठावर जाऊन बोलतात त्या पद्धतीनं त्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन आमच्या देखील भावना समजावून घ्याव्यात असं आवाहन यावेळी राजहंस यांनी पत्रकार बैठकीत केलंय.
या पत्रकार बैठकीला शिवानंद स्वामी,डॉ.मानसिंग शिंदे,दीपक देसाई,निरंजन देसाई उपस्थित होते.