आता पुणे - कोल्हापूर अन् कागल - बेळगांव राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करता येणार नाही : राजू शेट्टी 

<p>आता पुणे - कोल्हापूर अन् कागल - बेळगांव राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करता येणार नाही : राजू शेट्टी </p>

कोल्हापूर – काल सर्वोच्च न्यायालयाने खड्डे पडलेल्या रस्त्यावर टोल आकारता येणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्या  निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर व कागल ते बेळगांव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकाकडून टोल वसुली करता येणार नाही, अशी नोटीस माजी खासदार राजू शेट्टी यांनी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार  या दोन्ही मार्गावरील टोल बंद करण्यात यावे असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

https://www.facebook.com/share/p/1CeT68kJ5k/