राज्यकर्त्यांनो लाज वाटली पाहिजे तुम्ही...: राजू शेट्टींनी शेअर केला आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ 

<p>राज्यकर्त्यांनो लाज वाटली पाहिजे तुम्ही...: राजू शेट्टींनी शेअर केला आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ </p>

कोल्हापूर – अहिल्यानगरमधील बाबासाहेब सुभाष सरोदे या ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यावेळी बाबासाहेब यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेअर केला आहे.

यावेळी राजू शेट्टी यांनी,  “महायुती सरकारच्या कर्जमाफीस कंटाळून शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य...राज्यकर्त्यांनो लाज वाटली पाहिजे तुम्ही अदानी अंबानीचे कर्जमाफ करत आहात व शेतक-यांचा मात्र गळा घोटण्याचं काम करत आहात कुठे फेडाल हे पाप ? “ असे म्हटले आहे. 

अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील वडुले येथील बाबासाहेब सुभाष सरोदे (वय 44) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विष प्राशन करण्यापूर्वी बाबासाहेब सरोदे यांनी स्वतःचा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडिओत त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

https://www.facebook.com/share/v/1FmkAmmWDv/