मंत्रालयामध्ये आमदारांची धावपळ
निधीअभावामुळे आमदार सापडले अडचणीत

मुंबई - राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सगळ्याच पक्षांच्या आमदारांची निधी अभावामुळे मोठी अडचण झाली आहे. आपल्या हक्काचा निधी मिळावा. यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार मंत्रालयात दररोज धावपळ करत आहेत.
ठेकेदारांची थकीत देणी, लाडकी बहीण व इतर योजनांमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. गेल्या 9 महिन्यांपासून आमदारांना एकही रुपया मिळालेला नाही. तसेच मंत्री व अधिकाऱ्यांच्या कोणत्या गोष्टीला किती पैसे द्यावे याचा ताळमेळ न साधता आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. याचा फटका राज्यातील आमदारांना भोगावा लागत आहे.