विद्यापीठात विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

<p>विद्यापीठात विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल</p>

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनींन गर्ल्स होस्टेल मध्ये आज दुपारी पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केलीय. गायत्री पंढरीनाथ रेळेकर(वव २१, रा.सांगली) असं त्या विद्यार्थिनीचं नाव असून ती एमए – भूगोल च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. गर्ल्स होस्टेलमधील वसतिगृह क्रमांक-१ मध्ये गायत्रीनं आत्महत्या केलीय. या घटनेनं विद्यापीठ परिसरात खळबळ उडालीय. घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसांत करण्यात आलीय. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.