सरकार साडेचार वर्ष राहणार असेल, तर...
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

पुणे - '235 आमदारांचे सरकार आहे. त्यामुळे ज्यांना राजकारणात राहायचं आहे, त्यांना माहिती आहे की, सरकार साडेचार वर्ष राहणार असेल, तर यांचाच शर्ट पकडावा लागेल, नाहीतर काम होणार नाही. त्यामुळे मोठी रांग लागणार,' असल्याचे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कि, 'लोक म्हणतात, तुम्ही काही विरोधी पक्ष ठेवणार आहात की नाही. पण करणार तरी काय? चार-साडेचार वर्ष सरकार कुठे जाणार नाही,' असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.