आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो... शरद पवार यांचं महत्वाचं विधान

<p>आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो... शरद पवार यांचं महत्वाचं विधान</p>

नागपूर – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत खूप महत्त्वाचं आणि गंभीर विधान केलंय. विधानसभा निवडणुकांच्या वेळी मला दोन लोक भेटायला आले. त्यांची नावं, पत्ता आता माझ्याकडे नाहीत. महाराष्ट्रात २८८ जागा आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. त्यावेळी निवडणूक आयोगाबाबत माझ्या मनात अजिबात शंका नव्हती. त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्या लोकांची राहूल गांधींबरोबर मी भेट घालून दिली. त्या लोकांना जे म्हणायचं होतं ते राहुल गांधींसमोर म्हणाले. पण राहुल गांधी आणि मी दोघांनाही ते पटलं नाही. आम्ही लोकांमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.