कबनूरमधील श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : मंत्री आदिती तटकरे

<p>कबनूरमधील श्रीकृष्ण सांस्कृतिक भवनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : मंत्री आदिती तटकरे</p>

इचलकरंजी - कबनूरमध्ये महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्ण सांस्कृतिक भवन बांधले जाणार आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या इचलकरंजी दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार राहूल आवाडे यांनी, या भवनासाठी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजित बिरवटकर, कार्याध्यक्ष बाबुराव डाकरे, उपकार्याध्यक्ष मोहन दाभोकर, मारुती टाकाळे, अजित लटके यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.