आ. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण
आ.रोहित पवारांवर गंभीर आरोप

सोलापूर - आ. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण आणि मारहाण करण्यात आले आहे. हे अपहरण आ. रोहित पवार यांनी केल्याचा गंभीर आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात त्यांनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आ. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे कि, अपहरण आणि मारहाण प्रकरणात रोहित पवार मास्टरमाईंड आहेत. माझ्या गाडीवर दगडफेक करण्याचे आदेश आ. रोहित पवार यांनीच दिले होते. माझ्या कार्यकर्त्यांची हत्या करण्याचा कट त्यांचा होता.