'सरकारला सळो की पळो करून सोडा'
उध्दव ठाकरेंचा खासदारांना कानमंत्र

नवी दिल्ली - "सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा आहे, त्यांना जनहिताशी काहीही देणंघेणं नाही. शिवसेनेचा जन्मच जनहितासाठी लढा देण्यासाठी झाला आहे. तुम्ही संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या आणि सरकारला सळो की पळो करून सोडा," असा कानमंत्र उध्दव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना दिला आहे.
दिल्लीत उध्दव ठाकरे यांनी लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उध्दव ठाकरे यांनी अनेक राजकीय नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.