राज्य सरकारचा सावळागोंधळ 

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचे एकाच पदासाठी दोन आदेश

<p>राज्य सरकारचा सावळागोंधळ </p>

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार बीएमसीच्या दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढला आहे. त्यामुळे सरकारमधील सावळागोंधळ समोर आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग असून त्यांनी  काढलेल्या आदेशात आश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचे म्हटले आहे. आता एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याने कोणाच्या आदेशाचे पालन करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.