राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या पाठीशी : मुख्यमंत्री

मुंबई – आज महादेवीसाठी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महादेवी हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांची राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि तसे सुप्रीम कोर्टात सांगेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वासित करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आ.गणेश नाईक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नांदणी मठाच्या प्रतिनिधींसोबत प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, आ. सतेज पाटील, सदाभाऊ खोत, खा.धैर्यशील माने आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. 34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात असून, हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.