महायुतीची एसटी आता भरलीय.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल- आमदार सतेज पाटील

दिल्ली - महायुतीची एसटी आता भरलीय, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल असे विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते. सत्ताधारी सरकार विरोधात राज्यात प्रचंड असंतोष निर्माण झालाय. बेरोजगारी वाढलीय, महागाई वाढलीय. अमेरिकेने वाढविलेल्या टॅक्सचा मोठा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रावर होणारय. कार स्पेअर पार्टस, टेक्सटाईल कंपनींना याचा मोठा धोका निर्माण होणारय. राज्याची आर्थिक अवस्था बिकट झालीय. त्यामुळं शेतकरी, ठेकेदार आत्महत्या करतायत. हे सगळे विषय घेवून आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जावू , असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.