अलमट्टी प्रकरणी केंद्रानं हस्तक्षेप करून कणखर भूमिका घ्यावी - आमदार सतेज पाटील 

<p>अलमट्टी प्रकरणी केंद्रानं हस्तक्षेप करून कणखर भूमिका घ्यावी - आमदार सतेज पाटील </p>

दिल्ली -  अलमट्टी प्रकरणी केंद्रानं हस्तक्षेप करून कणखर भूमिका घ्यावी भावना विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या. अलमट्टी धरणाच्या उंचीवरून आज केंद्र शासनाकडून दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलीय. बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

कर्नाटक सरकारने ५१२ मीटर च्या वरती अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये. अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे बॅक वॉटर चा मोठा फटका कोल्हापूर, सांगली जिल्हाला बसतोय. केंद्र शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवायला देवू नये. तांत्रिक दृष्ट्या आम्हाला कोण समजावण्याचा प्रयत्न करत असेलतर हे चुकीचं आहे. कृष्णा लवादाचा दुष्परिणाम कोल्हापूर सांगली जिल्ह्यावर होत आहे. केंद्राने आता यामध्ये हस्तक्षेप करून कणखर भूमिका घ्यायला हवी. कोल्हापूर आणि सांगली जिल्हाला पुरात बुडवायचे कि नाही हा निर्णय केंद्रा शासनानं घ्यावा, अशी भावना विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. अलमट्टी आणि शक्तीपीठ हा कोल्हापूर आणि सांगली जिल्हातील हजारो शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहे. गरज नसलेला शक्तीपीठ झाला तर त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

 
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकभावनेचा आदर करून राज्य सरकारने माधुरी हत्तीण परत मिळावी यासाठी प्रयत्न करायला हवा, अशा भावना देखील आमदार पाटील यांनी व्यक्त केल्या.