झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली – राज्यसभा खासदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (गुरुजी) यांचे आज निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय 81 वर्ष होते. बऱ्याच काळापासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आहेत. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात ते कोळसा मंत्री होते.