महादेवी हत्तीणीसाठी खा. शाहू छत्रपतींचं पंतप्रधानांना पत्र...

<p>महादेवी हत्तीणीसाठी खा. शाहू छत्रपतींचं पंतप्रधानांना पत्र...</p>

कोल्हापूर - जैन समाजाच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे. परंतु हत्तीणीची नांदणी परिसरातील लाखो लोकांशी भावनिक नाळ जुळली आहे. त्यामुळे लोकभावनेचा विचार करून हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्यात यावे, याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी खा. शाहू छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

खा. शाहू छत्रपती म्हटले आहे कि, राज्य आणि केंद्र सरकारने यात पुढाकार घेऊन ही हत्तीण पुन्हा कोल्हापूरच्या नांदणी मठामध्ये कशाप्रकारे परत आणता येईल याचा विचार करावा. संबंधित यंत्राणांना आपण तशा सूचना द्याव्यात. मठाचे महत्व आणि हत्तीणीची परंपरा अबाधित राखण्यासाठी आपण योग्य पावले उचलाल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.