माजी पंतप्रधानांच्या नातवावर बलात्काराचा गुन्हा सिद्ध...

त्याला न्यायालयातच कोसळलं रडू

<p>माजी पंतप्रधानांच्या नातवावर बलात्काराचा गुन्हा सिद्ध...</p>

बेंगळुरू – माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू तथा माजी जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. २००४ मध्ये घरकाम करणाऱ्या ४७ वर्षीय महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णांना दोषी ठरवले गेले आहे. न्यायालयाने आज निकाल सुनावताच प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयातच रडू कोसळले आहे.२ ऑगस्ट रोजी न्यायालय प्रज्वल रेवण्णाला शिक्षा सुनावणार आहे. प्रज्वल रेवण्णा याचे 2000 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते. १४ महिन्यांनी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.