'जर कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर आम्ही खपवून घेणार नाही' : मुख्यमंत्री 

<p>'जर कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर आम्ही खपवून घेणार नाही' : मुख्यमंत्री </p>

मुंबई – माणिकराव कोकाटे यांच्या वाढत्या वर्तवणूकीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्याकडून कृषीखातं काढून घेतले आहे. हे कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तवणूक करेल तर आम्ही खपवून घेणार नाही”, असा टोला वाचाळवीरांना लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण जनतेची सेवा करण्यासाठी इथे आलो आहोत आणि जनतेची सेवा करताना आपण काय बोलतो, काय करतो या सर्व गोष्टी दिसतात आणि त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.