‘आपल्या कारकिर्दीतच कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू व्हावे’ 

 खा.शाहू छत्रपतींनी सरन्यायाधीशांपुढे व्यक्त केली इच्छा  

<p>‘आपल्या कारकिर्दीतच कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू व्हावे’ </p>

नवी दिल्ली -  खासदार शाहू छत्रपती यांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा झाली.  यावेळी त्यांनी “आपल्या कारकिर्दीतच हे सर्किट बेंच सुरू व्हावे”, अशी आग्रही इच्छा सरन्यायाधीशांकडे व्यक्त केली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे  उपस्थित होते.

 काही महिन्यांपूर्वी  गवई यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्यानंतर कोल्हापूरला न्यू पॅलेस मध्ये येऊन शाहू छत्रपती यांची भेट घेतली होती. त्यावेळी छत्रपती परिवाराने त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या होत्या. राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे आमच्यासारख्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली, असे उद्गार गवई यांनी काढले होते.