लोकसभेत खा. प्रियंका गांधींनी सरकारचा बुरखा फाडला... 

सरकारला पहलगामच्या परिस्थितीबाबत माहिती नव्हतं? 

<p>लोकसभेत खा. प्रियंका गांधींनी सरकारचा बुरखा फाडला... </p>

नवी दिल्ली - कालपासून लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना कसे प्रत्युत्तर दिलं, याचा पाढा वाचला. यावर खा. प्रियंका गांधी यांनी, “सरकारने सर्व सांगितलं, इतिहासही सांगितला, पण एक गोष्ट राहिली, पहलगाममध्ये हल्ला कसा झाला, तो का झाला?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आणि सरकारचा बुरखा फाडला.

खा. प्रियंका गांधी म्हणाल्या कि, पर्यटक पहलगामला सरकारच्या भरवश्यावर गेले होते, पण सरकारनं त्यांना देवाच्या भरवश्यावर सोडून दिलं, कालपासून मी सत्ताधाऱ्यांची भाषणं ऐकते आहे. संरक्षण मंत्र्यांनी तासाभराचं भाषण केलं. पण त्या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट सुटली. २२ एप्रिल रोजी जेव्हा २६ भारतीयांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर जीवे मारलं गेलं, तो हल्ला कसा झाला? का झाला? हे दहशतवादी तिथे कसे आले? आजकाल प्रचाराचं युग आहे. आपलं सरकार गेल्या काही काळापासून जाहिरातबाजी करत आहे की काश्मीरमध्ये सगळं काही व्यवस्थित झालं आहे. पण त्याचदरम्यान पहलगाममध्ये हल्ला झाला”
यावेळी त्यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ दिला. “एक तास हे दहशतवादी तिथे बेफामपणे सगळ्यांना मारत होते. या दरम्यान तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. देशाने, सरकारने आम्हाला तिथे अनाथ सोडून दिलं होतं”असं त्यांनी सांगितलं.  
“सरकारला तिथल्या परिस्थितीबाबत माहिती नव्हतं? हे लोक तिथे सरकारच्या भरवश्यावर गेले, आणि सरकारनं त्यांना तिथे देवाच्या भरवश्यावर सोडून दिलं. या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती? पंतप्रधान, गृहमंत्र्यांची, संरक्षण मंत्र्यांची नव्हती का?” असा जाब त्यांनी भर सभेत विचारला. देशाला गोल्ड मेडल मिळाल्याचे श्रेय जसं घेता येतं तसं जबाबदारी ही घ्यायला हवी. 
हल्ल्याच्या दोन आठवडे आधी गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या पहलगाम दौऱ्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. “पहलगामच्या फक्त दोन आठवडे आधी गृहमंत्री तिथे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गेले होते. ते तिथे म्हणाले होते की, आता दहशतवादावर विजय मिळाला आहे. हल्ल्याच्या तीन आठवड्यांनंतर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल एका ठिकाणी सहज म्हणाले की, तिथे घडलेल्या गोष्टींमध्ये खूप दुर्लक्ष झालं होतं आणि त्याची जबाबदारी मी घेतो. पण ते तिथेच संपून जातं. त्यांना कुणी काही विचारत नाही, ते कुणाला काही उत्तरही देत नाही”, असे म्हणत खा. प्रियंका गांधी यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.