आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री कोकाटेंबाबत होणार निर्णय..?

 उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषिमंत्र्यांची काढली खरडपट्टी 

<p>आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री कोकाटेंबाबत होणार निर्णय..?</p>

मुंबई – अधिवेशनानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत  निर्णय होवू शकतो. या भीतीपोटी मंत्री कोकाटे आपल्या मुलीला घेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

“तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री कोकाटेंना झापले.  यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झालेल्या  प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार नाहीत, असे आश्वासनही दिले. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत राज्य मंत्रिमंडळात कोणता निर्णय होतो हे आता पहावे लागणार आहे.