सरकारला भिकारी म्हणणाऱ्याला मंत्रिमंडळात ठेवू नका
कृषिमंत्र्यांविरोधात खा. सुप्रिया सुळे आक्रमक

मुंबई - सरकारला भिकारी म्हणणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नका, असा आक्रमक पवित्रा खा. सुप्रिया सुळे यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळताना सापडले होते. त्यानंतरही ते शांत न बसता सरकार आणि शेतकऱ्यांविरोधात बेताल वक्तव्य करतच आहेत. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांनी, शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.
आज अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होत आहे. यावेळी बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.