पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे म्हणाल्या...

पुणे - शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत सापडले आहेत. खेवलकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर रोहिणी खडसे यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, योग्य वेळी सत्य बाहेर येईल” असं रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.