खा.संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल 

<p>खा.संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल </p>

मुंबई - खा. संजय राऊत यांच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात  अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खा.संजय राऊत यांनी  मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्यावरून  नांदगावच्या भाजप मंडळ अध्यक्षांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत खा. राऊत यांनी महाजन यांच्यासह भाजप पक्षावर वैयक्तिक स्वरूपाचे विधान केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार भाजपच्या संजय सानप यांनी नांदगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.