मी पुढेमागे कधी मुख्यमंत्री झालो तर...

मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य 

<p>मी पुढेमागे कधी मुख्यमंत्री झालो तर...</p>

कोल्हापूर – “मी पुढेमागे कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन” असे वक्तव्य एका कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.  या माध्यमातून त्यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायची इच्छा असल्याचे दर्शवले आहे.

शेतकऱ्यांना आता 50 हजार मिळत असतील तर मी ती रक्कम 1 लाख रुपये करेन, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.  आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे वचन दिले आहे. पण सध्याची परिस्थिती थोडी अवघड आहे. लाडक्या बहि‍णींना 46 हजार कोटी रुपये द्यावे लागत आहेत. काही पुरुषांनीही लाडक्या बहीण योजनेचे  पैसे घेतले. आमची अडचण असली तरी आम्ही कर्जमाफी अनेकदा केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.