आणि महिला वन अधिकाऱ्यानं काही मिनिटांत अठरा फुट किंग कोब्रा पकडला...

<p>आणि महिला वन अधिकाऱ्यानं काही मिनिटांत अठरा फुट किंग कोब्रा पकडला...</p>

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एका धाडसी महिला वन अधिकाऱ्यानं रेस्क्यू करून काही मिनिटांत किंग कोब्राला पकडून सर्वांना चकित केलंय. अत्यंत धोकादायक असणारं हे काम पारुथिपल्ली रेंजच्या फॉरेस्ट बीट  

ऑफिसर रोशनी या महिला अधिकाऱ्यानं संयम, आत्मविश्वास आणि अनुभवानं केलंय. महिला अधिकाऱ्याचं धाडस पाहून सर्वांनी त्यांना सलाम ठोकलाय. भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रणरागिणी रोशनी यांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांना सॅल्यूट केलाय.