महायुतीत खदखद... अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार...

मुंबई – महायुतीमध्ये निधी वाटपावरून खटके उडायला सुरुवात झाली आहे. या पूर्वी निधी वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद झाला होता त्यावर संयुक्तिक बैठक आयोजित करण्यात आली होती तरीही वाटपामधील नेत्यांमधील वाद काही मिटायचं नाव घेत नाहीय. आता तर  शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांकडून निधी वाटपात भेदाभेद केला जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमधील खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.