आमच्यातला आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी- उद्धव ठाकरे
‘एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी’ ...

मुंबई - हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून अठरा वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधु वरळी येथे विजयी मेळाव्यानिमित्त एका मंचावर आले. कोणत्याही पक्षाचा झेंडा नसताना ते मराठी मुद्द्यावरून एकाच मंचावर आले. ‘एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच्च करत या मेळाव्यात दोन्ही पक्षांच्या युतीबाबत काही संकेत दिले.
आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतानी दूर केला. आता एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आजपर्यंत अनेकांनी वापरलं आणि फेकून दिलं. आता आम्ही दोघे मिळून फेकून देणार आहोत. भाजप ही अफवांची फक्टरी आहे. तोड, फोडा आणि राज्य करा अशी त्यांची नीती आहे भाजप पक्ष कशातही नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील नव्हता. मुंबई मराठ्यांनी रक्त सांडून घेतलीय. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही असे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात. पण मराठी न्याय मागणीसाठी आम्ही गुंड आहोत हे लक्षात ठेवावं. दिल्लीत दोन व्यापारी बसलेत, राजकारणातले हे व्यापारी आहेत. महाराष्ट्रातील काही लोक त्यांचे बूट चाटण्याचं काम करतात. आम्ही त्यांच्या पालख्यांचे बळी होणार नाही. माय मराठी ला सन्मानाने पालखीत बसवणार असं उद्धव ठाकरे सांगितलं.
आता लाडक्या बहिणींचं पोर्टल बंद झालंय असं म्हणतात. आता लाडक्या बहिणी काय करणार? सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यासाठी सरकार काय करतंय. हिंदीची सक्ती केला तर शक्ती दाखवू , मग पुन्हा डोके वर नाही काढणार. हा फक्त प्रीमियर आहे, आजपासून सुरवात झालीय. उघडा डोळे बघा निट. रक्ताची शपथ घेवून मराठी आणि मुंबईची रक्षण करण्यासाठी उभा राहायला हवं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.