हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?
खा. संजय राऊत यांचा सवाल

मुंबई – नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “जय गुजरात” ची घोषणा दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यावर ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी ट्वीट करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार ह्ल्लाबोल केला आहे.
खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, “अमित शहा यांच्या समोर डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले ! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या.. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?”