कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार...

मुख्यमंत्र्यांचा आमदारांना सल्ला

<p>कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार...</p>

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भाजपातील आमदारांना  वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनासाठी बोलवून विशेष सल्ला दिला आहे.
‘मतदार आणि मतदारसंघाच्या हिताचा विचार करून कामे करा. कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जावा. मतदारांचे हित केंद्रस्थानी ठेवून त्यांचे भले कशात आहे, याचा विचार करूनच कामे करा, त्यासाठी आमदार निधीचा योग्य वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
पक्षात येणाऱ्यांना विरोध करण्याची भूमिका घेऊ नका असं सांगत सध्या होणारे पक्षप्रवेश फायद्याचेच असून मतदारसंघासाठी तुमचा (आमदारांचा) आणि पक्षसंघटनेचा शब्दच अंतिम असेल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.