शहरातील कचऱ्याचं व्यवस्थापन करा, अन्यथा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
ठेकेदार कंपनीनं करार मोडला असेलतर कारवाई करा

कोल्हापूर शहरातील कचरा समस्या, नालेसफाई आणि झूम प्रकल्प या विषयवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महापालिका प्रशासनासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडीमार केला. शहराध्यक्ष आर के पोवार यांनी, शहरातील हत्ती महल इथल्या मटण मार्केटच्या पाठीमागे असलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा उठाव होत नसल्याचं सांगितलं राजाराम बंधाऱ्यावर पन्नास टन कचरा वाहून आल्यानं शहरातील नालेसफाईच्या कामावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं झूम प्रकल्पातील कचरा पेटवल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकल्पातील कचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी तीस वर्षाचा ठेका देण्यात आला होता त्याचं काय झालं, संबंधित ठेकेदार कंपनीनं करार मोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई का नाही. असा सवाल उपस्थित करण्यात आला. शहरातील कचऱ्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना याबाबतचं निवेदन देण्यात आला.
यावेळी अनिल घाटगे गणेश जाधव, सुनील देसाई, साहिल बागवान, राजाराम सुतार, सादिक अत्तार, शशिकांत कदम, सुनील सावर्डेकर, महादेव पाटील, हिदायत मणेर, सुरेश कुरणे, चंद्रकांत सूर्यवंशी, रियाज कागदी आदी उपस्थित होते.