संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला : खा. शरद पवार
मुंबई - ज्येष्ठ सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला असल्याची भावना खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
खा. शरद पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे कि, आशाताईंच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!