शिंदे योग्यवेळ पाहून ऑपरेशन टायगर करतील : मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य 

<p>शिंदे योग्यवेळ पाहून ऑपरेशन टायगर करतील : मंत्री संजय शिरसाट यांचे सूचक वक्तव्य </p>

मुंबई - केंद्रात ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार शिंदेंच्या नेत्यांकडून ऑपरेशन टायगरबाबत वेगवेगळे वक्तव्य केले जात आहे. 
शिंदे योग्यवेळ पाहून ऑपरेशन टायगर करतील. शिकार टप्प्यात आल्यानंतर एका दिवसांत ऑपरेशन पूर्ण होईल, असे सूचक वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. तसेच  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी,  'शिवसेनेत एक नाही, बरेच लोक येणार आहेत', असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.