‘स्वप्नातही मला वाटलं नव्हतं की बारामतीत...': उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

बारामती पोटनिवडणुकीसाठी दाखल केला अर्ज 

<p>‘स्वप्नातही मला वाटलं नव्हतं की बारामतीत...': उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर</p>

बारामती – आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेच्या बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या कि,  स्वप्नातही मला वाटलं नव्हतं की बारामतीत पोटनिवडणूक होईल. दादांचं जाणं आपल्याला मान्य नाही. दादांचं जाणं म्हणजे माझं आणि माझ्या कुटुंबाचं दु:ख नव्हे तर देशाची हानी आहे. मी माझं दु:ख तळघरात कोंडलं आहे, मात्र हा धीर बारामतीकरांकडूनच मिळाल्याचं आपण नम्रपणे कबुल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.