जनगणना आणि मतदार नोंदणी अभियानात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे : जिल्हाप्रमुख रवींद्र माने

<p>जनगणना आणि मतदार नोंदणी अभियानात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे : जिल्हाप्रमुख रवींद्र माने</p>

इचलकरंजी – शिवसेनेने तळागाळापर्यंत जाऊन जनगणना आणि  मतदान नोंदणी अभियान हाती घेतले असल्याचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी सांगितले. इचलकरंजीत  शिवसेना शिंदे गटाची बैठक आज पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ सुजित  मिणचेकर,  पुंडलिक  जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी शहरात आणि  ग्रामीण भागात  शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.  या बैठकीत  मार्गदर्शन करताना माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी, जनगणनेपासून आणि  मतदानापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये याची खबरदारी घेण्यासाठी  शिवसेनेने बीएलओ नेमण्याचे काम सुरू केले असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर येऊन नाव नोंदणी करावी आणि  बीएलओ चे काम पूर्ण करावे, जेणेकरून  येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा शिवसेनेला होईल असे सांगितले.  या बैठकीला शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.