अशोक खरातला ‘या’ नेत्यांनी केला फोन कॉल : अंजली दमानियाकडून मोठी माहिती समोर
मुंबई – सध्या भोंदूबाबा अशोक खरातबरोबरचे राजकीय लोकांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण येत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी, खरातबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी केलेल्या फोन कॉलचे रेकार्ड बाहेर काढले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
रूपाली चाकणकर यांनी एकूण 177 कॉल खरातला केले आहेत. यामध्ये दोघांमध्ये 33 हजार 727 सेकंदाचे संभाषण झाले तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनी भोंदू खरातला 236 कॉल केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहेत. या 17 कॉल्समध्ये 10 इनकमिंग, 7 आऊटगोईंग कॉल्स झाले आहेत.
चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी 8 कॉल आहेत, असे दमानिया म्हणाल्या आहेत.