'या' बड्या नेत्यावर आणि मुलीवर ॲट्रासिटीचा गुन्हा

<p>'या' बड्या नेत्यावर आणि मुलीवर ॲट्रासिटीचा गुन्हा</p>

जळगाव – आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी  फसवणूक करण्यासह अनुसुचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

२००२ साली भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारातील जमिनी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली विकत घेण्यात आल्या होत्या. यात गट क्रमांक १२२ ही महार वतनाची जमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसदारांच्या मालकीची होती. खरेदी करतांना तायडे कुटुंबाला जमिनाचा चांगला मोबदला मिळण्यासह कुटुंबातील सदस्यांना नियोजीत तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार तायडे कुटुंबाला एकनाथ खडसे यांच्याकडून आगावू ५१ हजार रूपये देण्यात आले. यानंतर सर्वांचे कागदांवर अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी करण्यात आली. यानंतर उर्वरित पैशांसाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील या कुटुंबाला देण्यात आलेली नाही.