सराफाला मारहाण करून लुटमार करणारा गुन्हा उघड, दोन आरोपी अटक

<p>सराफाला मारहाण करून लुटमार करणारा गुन्हा उघड, दोन आरोपी अटक</p>

कोल्हापूर – सांगरुळ येथे सराफ तेजाराम पेराजी माळी यांच्या दुकानावर झालेल्या लुटमार प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे. गेल्या २१ मार्च २०२६ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तेजाराम माळी हे आपले लक्ष्मी ज्वेलर्स दुकान बंद करून मोटरसायकलवर घरी जात होते. त्यावेळी अज्ञात इसमांनी मोटरसायकल थांबवून त्यांना मारहाण करून ५१ ग्रॅम सोन्याचे व ११९ ग्रॅम चांदीचे दागीने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली होती. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला होता. संपूर्ण तपासानंतर, हा गुन्हा प्रवीण माळी व त्याची महिला साथीदार खुशबू जसराज परमार यांनी ठरवून केला असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी २८ मार्च रोजी पतौडी घाट, रंकाळा येथे दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरी केलेले ५१ ग्रॅम सोन्याचे व ११९ ग्रॅम चांदीचे दागीने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक बुलेट मोटरसायकल व एक अॅक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे ११,१८,२५०/- रुपये आहे. अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार महेश पाटील, हिंदुराव कैसरे, संजय कुंभार, संतोष बरगे, रोहीत मर्दाने, वैभव पाटील, प्रदीप पाटील, सागर माने, अमित सर्जे, अरविंद पाटील, संजय पडवळ, संजय हुंबे व महिला पो. कॉ. प्रज्ञा पाटील यांनी केली.