अशोक खरातच्या पाठीशी 40 आमदार : खा. संजय राऊत
मुंबई - अशोक खरात हा भोंदू बाबा तर आहेच पण त्याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे. खरात सरकारचा माणूस असून त्याच्या पाठीशी 40 आमदार असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.
"दीपक केसरकर यांना चौकशीसाठी बोलवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची ही चौकशी करा. अमित शाहांपर्यंत अशोक खरात कसा पोहचला याची ही चौकशी करा," अशी मागणी खा. संजय राऊत यांनी केली आहे. अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता, असा दावाही त्यांनी केला आहे.