रंकाळा परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल करण्याची मागणी

<p>रंकाळा परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल करण्याची मागणी</p>

कोल्हापूर : शहरातील रंकाळा परिसरात आज सकाळी चंदनाच्या झाडाची चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने झाड तोडून ते चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला. चंदनाचे झाड हे मौल्यवान असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तोडलेलं चंदनाचे झाड आपल्या ताब्यात घ्यावे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रजासत्ताक चे दिलीप देसाई यांनी केली आहे.